धोतीराम झुले
धोतीराम झुले

@jhuleDhotiRam

8 Tweets 10 reads Aug 23, 2021
#Thread:-
डॉक्टर आंबेडकर यांच्या द्वितीय पत्नी सविता कृष्णराव कबीर या जन्माने ब्राह्मण होत्या. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे बाबासाहेबांसोबत सविता आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारला. म्यानमारचे भिक्खू महास्थवीर चंद्रमणी यांचेकडून डॉ. बाबासाहेब व-
सौ. डॉ. सविता आंबेडकर यांनी त्रिशरण व पंचशील ग्रहण करून सर्वप्रथम धम्मदीक्षा घेतली. सविता आंबेडकर या धर्मांतर आंदोलनातील बौद्ध धम्म स्वीकारणाऱ्या पहिल्या महिला होत्या. डॉ. माईसाहेब आंबेडकरांनी ‘डॉ. आंबेडकरांच्या सहवासात’ हे आत्मचरित्र लिहिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या-
‘द बुद्ध ॲन्ड हिज् धम्म’ किंवा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या प्रस्तावनेत डॉ. बाबासाहेबांनी त्यांना ८ वर्ष अधिक जगविण्याचे श्रेय डॉ. सविता आंबेडकरांना दिले होते. हे पुस्तक बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर पीपल्स एज्युकेशन सोसायटीने प्रसिद्ध केले. “ती प्रस्तावना जर छापली-
असती तर दलित चळवळ डॉ. सविता आंबेडकरांच्या हातात गेली असती, असे दलित नेत्यांना वाटले, त्यामुळे ती प्रस्तावना पुस्तकातून गाळण्यात आली”, असे रावसाहेब कसबे यांचे म्हणणे, त्यांनी त्यांच्या ‘भक्ती आणि धम्म’ या पुस्तकात मांडले आहे.
डॉक्टर आंबेडकरांच्या मृत्यूनंतर सविता आंबेडकर यांनीच-
त्यांचा खून केला आहे असा आरोप करून त्याची चौकशी करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर दबाव आणण्यात आला होता. यासाठी चौकशी समिती सुद्धा नेमली गेली होती परंतू त्यातून पुढे काहीच निष्पन्न झाले नाही. मात्र सविता आंबेडकर यांना प्रचंड मनस्ताप झाला आणि प्रसिद्धीच्या-
झोतातून त्या बाहेर फेकल्या गेल्या आणि दुर्लक्षित केल्या गेल्या.
२९-मे-२००३ रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी जेव्हा त्यांचे निधन झाले तेव्हा सर्व रिपब्लिकन गटांनी आणि आंबेडकरवादी नेत्यांनी त्यांना संपूर्ण बेदखल केला होते. त्यांच्या अंत्यविधीसाठी रामदास आठवले सोडले तर कोणीही नेते-
उपस्थित नव्हते अ आणि मुख्य म्हणजे आंबेडकर आडनाव लावणाऱ्या आणि त्यांचा वारसा सांगणाऱ्या लोकांपैकी कोणीही नव्हते. डॉक्टर आंबेडकरांनी जवळ केलेल्या व्यक्ती आणि विचार त्यांच्या भक्तांनी जवळ केल्या नाहीत, त्यातून सविता कबीर ह्या ब्राह्मण असताना त्या कशा सुटू शकतील?
शेवटी आंबेडकरी विचारापेक्षा रक्तात भिनलेला जातीभेद हाच जास्त बलवान ठरला म्हणून बौद्ध धर्मियांनी त्यांना स्वीकारले नाही.
काही मजकूर mr.wikipedia.orgसविता_आंबेडकर#धर्मांतर मधून घेतला आहे.

Loading suggestions...