Pawan/पवन
Pawan/पवन

@thepawanupdates

15 Tweets 6 reads Oct 17, 2021
#Thread
रविवार विशेष 🧵⬇️
आपले राष्ट्रीय चिन्ह : सारनाथ येथील अशोकस्तंभ - 2300 वर्षाचा इतिहास!!
1940 च्या शेवटी-शेवटी पश्चिम बंगाल येथील शांतिनिकेतनमधील विश्वभारतीच्या तरुण विद्यार्थ्याला एक 'असामान्य' असे काम नेमून देण्यात आले व त्यामुळे त्याला कलकत्ता येथील प्राणी
#History
संग्रहालयात असलेल्या सिंहांचे निरीक्षण करण्यासाठी दररोज 200 किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता, हा प्रवास त्याने 1 महिना रोज केला होता. त्या 21 वर्षीय विद्यार्थ्याचे नाव होते 'दीनानाथ भार्गव'.
त्याच्या या प्राणिसंग्रहालयाच्या दैनंदिन सहलींच्या माध्यमातून तो त्याच्या
#India
कारकीर्दीतील सर्वात महत्त्वाच्या ठरणार्‍या कामगिरीची तयारी करत होता आणि ती कामगिरी दुसरी-तिसरी कोणतीही नव्हती तर भारताच्या राष्ट्रीय प्रतीक चिन्हाच्या रचनेवर त्याला काम करायचे होते.
हे प्रतीकचिन्ह महान राजा असलेले सम्राट अशोक यांनी स्थापन केलेल्या सारनाथ येथील
#culture
अशोकस्तंभावरील बोधचिन्हाचे प्रतिनिधित्व करीत होते. ( याच ठिकाणी भगवान गौतम बुद्धांनी आपले पहिले प्रवचन दिले होते)
भार्गव हे त्या पाच कलाकारांमध्ये सामील होते ज्यांची निवड विश्वभारती येथील ललित कला विभागाचे प्राचार्य श्री नंदलाल बोस यांनी भारतीय राज्यघटनेचे मुखपृष्ठ आणि
#PROUD
पृष्ठसजावटीसाठी केलेली होती.
याचसोबत या कलाकाराला अशोक स्तंभावरील असलेल्या सिंहाचे चित्रीकरण यावर साकारायचे होते. त्यामुळे 'पवित्र राज्यघटने'ची शोभा आणखी वाढणार होती.
आज घडीला 'अशोकस्तंभा'ची मूळ प्रतिमा ही उत्तर प्रदेशातील सारनाथ येथील संग्रहालयात आहे.
#Buddha
सम्राट अशोक हे महान मौर्य राजा इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकात होऊन गेलेले आहे. जे बौद्ध धर्माचे महान उपासक सुद्धा होते व त्यांनीच शक्ती, धैर्य, आत्मविश्वास आणि अभिमान दर्शवणारे हे चार आशियाई सिंह एकापाठोपाठ असलेले भव्य सात फूट उंचीचे शिल्प आपल्या काळात निर्माण करून घेतलेले आहे.
हे चार सिहांचे शिल्प ज्यावर आहे त्याचा बेस हा अबॅकस सारखा असून त्यावर सरत्या पद्धतीने एक सिंह, एक घोडा, एक बैल आणि एक हत्ती असे चार प्राणी आहेत आणि प्रत्येकाच्या मधात 'चक्र' सुद्धा आहे. हा बेस एका उलट्या कमळावर ठेवलेला आहे जो बौद्ध धर्माचे 'सार्वत्रिक प्रतीक' सुद्धा आहे.
सन 1947 मध्ये ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस भारताला एका राष्ट्रीय चिन्हाची आवश्यकता होती. जे भारताचे आचार व विचार याचे प्रतिनिधित्व करते. तत्कालीन राजकीय नेतृत्वाने सम्राट अशोक यांच्या सारनाथ येथील स्तंभावरील सिंहांना आपले राष्ट्रीय चिन्ह बनविण्याचा निर्णय घेतला आणि
तो 30 डिसेंबर रोजी अधिकृतपणे स्वीकारला गेला. त्याचे अंतिम चित्ररुपी रेखाटन हे दोन वर्षानंतर शांतिनिकेतन मधील दिनानाथ भार्गव यांनी पूर्ण केले.
भार्गव यांची कला इतकी अद्वितीय होती की, त्या चित्रात चार सिंह असूनही फक्त तीन सिंह दिसतात. कायद्याचे प्रतीक असलेले असलेले 'चक्र' हे
अबॅकसच्या मध्यभागी आणि त्याच्या उजवीकडे बैल व डावीकडे घोडा हे चालत्या दिशेत दिसतात. धर्मचक्रात असलेल्या रेषा या डावी व उजवीकडे स्पष्टपणे दिसतात. मूळ सारनाथ येथील स्तंभात असलेले कमळ हे वगळण्यात आले व त्याऐवजी उपनिषदातून घेतलेले 'सत्यमेव जयते' हे ब्रीदवाक्य त्याखाली आपणास दिसून येत
भार्गव यांनी साकारलेली ही कलाकृती बघून बोस हे जेव्हा पूर्णपणे समाधानी झाले. त्यानंतरच भारतीय संविधानाच्या मुखपृष्ठावर अभिमानाने या 'राष्ट्रीय चिन्हाने' स्थान मिळविले आणि अशाप्रकारे जेव्हा 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना ही भारतात लागू झाली.
#Constitution
तेव्हा भारताने भार्गव यांनी साकारलेले राष्ट्रीय चिन्ह म्हणून स्वीकारले.
सिंह हे राजेशाही आणि शक्तीचे प्रतीक असताना, येथे चार सिंह हे चारही बाजूने 'बुद्धांचा संदेश' जगाला देत आहे असे या सिहांच्या उघड्या तोंडावरून सूचित होते, असे विद्वानांचे म्हणणे आहे. चक्र किंवा कायद्याचे चाक
हे आणखी एक शक्तिशाली असे 'बौद्ध आकृतीबंध' आहे जे भगवान बुद्धांच्या कल्पनांचे प्रतीक सुद्धा आहे.
ही माहिती आज उलगडून सांगण्याचा उद्देश इतकाच की, आपण बरेचदा हे राष्ट्रीय चिन्ह बघतो पण ते सारनाथ येथील अशोकस्तंभ आहे, इतकेच आपल्याला माहिती आहे.
#Emblemvault
त्याउपर ते का घेण्यात आले? त्यामागची कारणे काय होती? हे सुद्धा एक भारतीय नागरिक म्हणून आपल्याला माहिती असायला हवे, म्हणून हा प्रपंच.
क्रमश:
पुढील भागात विविध ठिकाणी असलेल्या अशोकस्तंभांची वैशिष्ट्यपूर्ण माहिती आपल्यासमोर घेऊन येणार आहे.
धन्यवाद!
पवन✍️
ज्यांनी हा विषय सुचविला ते @girish_bhau भाऊ आणि ज्यांनी रिसर्च करून माहिती दिली ते गुरुदेव @researchanand यांचेही आभार!!

Loading suggestions...