Pawan/पवन
Pawan/पवन

@thepawanupdates

20 Tweets 2 reads Oct 22, 2021
#Thread
द युनिव्हर्स 25 : हिंदूंना सावध करणारा एक वैज्ञानिक प्रयोग!🧵
'द युनिव्हर्स-25' हा विज्ञानाच्या इतिहासातील सर्वात भयभीत करणारा प्रयोग आहे, असे म्हटले तरी ते अतिशयोक्तीपूर्ण ठरणार नाही. कारण या प्रयोगाच्या माध्यमातून एका बंदिस्त जागेत उंदरांना वसाहत केल्यासारखे ठेवून,
त्यांच्या वागण्यातील बदलावरून वसाहती करून (समाजात) राहणार्‍या मानवांच्या वागण्यातील बदलांचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिकांद्वारे केल्या गेलेला हा प्रयोग होता.
या प्रयोगाची कल्पना ही अमेरिकन शास्त्रज्ञ जॉन बी. कॅल्होन यांची होती. ज्यांनी उंदरांसाठी एक वेगळं विश्व तयार केलं.
ज्यामध्ये शेकडो उंदीर राहू शकत होते आणि प्रजनन करू शकत होते.
आणखी थोडसं उलगडून सांगायचं म्हटलं तर कॅल्होनने 'उंदराचा स्वर्ग' निर्माण केलेला होता. ज्यामध्ये त्यांना एक विशिष्ट जागेत राहायचं होतं. जिथे जेवण आणि पाणी या दोन्ही गोष्टींसोबत राहण्यासाठी मोठी जागा
#Hindutva
सुद्धा उंदरांना मिळत होती. साध्या भाषेत आपल्या भारतात 'बिग बॉस' मध्ये राहतात त्याप्रमाणे. सुरुवातीच्या काळात त्यांनी चार उंदरांच्या जोड्या त्यामध्ये सोडल्या आणि लवकरच त्या उंदरांनी तिथे प्रजनन कार्य सुरू केले. ज्यातून तिथली उंदरांची लोकसंख्या भराभर वाढायला लागली.
#हिंदुत्व
परंतु 315 दिवसानंतर त्यांच्या होत असलेल्या प्रजननामध्ये अचानकपणे मोठ्या प्रमाणावर घट व्हायला लागली, जी डोळ्यात भरणारी होती. ज्यावेळी लहान-मोठ्या उंदरांची संख्या ही 600 वर पोहोचली, त्यावेळी त्यांच्यामध्ये लहान-मोठी अशी श्रेणी (गट) तयार झाली आणि त्यानंतर
त्यांच्यामध्ये 'सो कॉल्ड नैराश्य' यायला लागले.
मोठे उंदीर होते ते दुसर्‍या गटावर हल्ला करायला लागले. त्यामुळे बरेच पुरुष किंवा नर उंदीर हे मानसिकरित्या खच्ची व्हायला लागले. याचा परिणाम असा झाला की, ज्या महिला किंवा मादा उंदीर (उंदरी) होत्या, त्या स्वतःचे रक्षण करू शकत
नव्हत्या आणि त्यातून त्या तरुणांच्या उंदरांच्या विरोधात आक्रमक झाल्या.
जसजसा आणखी काळ जाऊ लागला तसतसा मादा उंदरांकडून अधिकाधिक आक्रमक वर्तन व्हायला लागले, त्यांच्यामध्ये एकटेपणाची भावना यायला लागली आणि त्यातूनच मग त्यांची प्रजननाची इच्छा कमी व्हायला लागली, त्यामुळे सहाजिकच
त्यांचा प्रजनन दर हा कमी झाला. त्यावेळी त्यांच्यातील तरुण उंदरांची मृत्युमुखी पडण्याची संख्या वाढायला लागली. त्यानंतर त्यांच्यामध्ये पुरुष उंदरांचा एक नवीन गट तयार झाला, जे 'सो कॉल्ड सुंदर उंदीर' (स्त्रि उंदरांसारखे सुंदर) होते. त्यामुळे ते उंदीर स्त्री उंदरांसोबत भेट घेणे
टाळायला लागले किंवा स्वतःच्या जागेसाठी/अस्तित्वासाठी भांडायला लागले. त्यांना फक्त आपल्या खाण्याची आणि झोपण्याची चिंता होती. एक काळ असा आला की, सुंदर असलेले पुरुष उंदीर आणि एकट्या पडलेल्या महिला उंदीर यांची संख्या तिथे जास्त झाली.
कॅल्होनच्या मते, मृत्यू दराच्या वेळेस मृत्यूदर हा दोन टप्प्यांमध्ये होता एक म्हणजे पहिला मृत्यू आणि दुसरा म्हणजे दुसरा मृत्यू.
त्या लोकांमध्ये जीवन जगण्यासाठी कोणतेही 'ध्येय' नव्हते. ते फक्त जिवंत राहण्यासाठी जगत होते. त्यांच्यामध्ये प्रजनन करण्याची इच्छा नव्हती,
मुलांना मोठे करण्याची इच्छा नव्हती किंवा स्वतःची सामाजिक भूमिका समाजात निर्माण करण्याची सुद्धा इच्छा नव्हती. जसजसा काळ गेला तसतसा किशोरवयीन उंदरांचा मृत्यू दर 100% पर्यंत पोहोचला आणि प्रजनन हे शून्य झाले.
सोबतच या संपत चाललेल्या उंदरांमध्ये 'समलैंगिकता' वाढल्या गेल्याचे
निदर्शनास आले आणि त्याचवेळी भरपूर प्रमाणात अन्न असूनही नरभक्षण हे त्यांच्यामध्ये वाढले. यामुळेच दोन वर्षानंतर त्या ठिकाणी नवीन उंदराने जन्म घेतला आणि 1973 पर्यंत त्या 'द युनिव्हर्स 25' मधला शेवटचा उंदीर त्याने मारून टाकला.
कॅल्होनने हा प्रयोग आणखी 25 वेळा केला आणि 25 ही वेळा
त्याचा निकाल हा एक सारखाच होता. कॅल्होनने केलेला हा वैज्ञानिक प्रयोग 'सामाजिक पतनाची' व्याख्या करण्यासाठी एक 'दिशादर्शक मॉडेल' म्हणून वापरल्या गेला आहे आणि त्याचे संशोधन हे 'शहरी समाजाच्या अभ्यासासाठी केंद्रबिंदू' म्हणून काम करते.
आज आपण आपल्या आजूबाजूला बघितले तर आजच्या समाजव्यवस्थेत आपल्याला वरील उंदरांच्या प्रयोगातील सर्व मुद्दे मोठ्या प्रमाणावर दिसून येतील, ज्याचे आपण स्वतः साक्षीदार आहोत. कमकुवत आणि स्त्रियांचे रक्षण करण्याची भावना नसलेले पुरुष, (काही अपवाद आहेत) सोबतच पुरुष असूनही स्वतःमध्ये
स्त्रित्व निर्माण झाल्याची भावना निर्माण झालेले पुरुष सुद्धा आहेत, ज्याला आपण 'समलैंगिक' असलेले सुद्धा म्हणू शकतो आणि दुसरीकडे मातृत्वाची प्रवृत्ती नसलेल्या आणि जास्त उत्तेजित असलेल्या आक्रमक महिलासुद्धा आज आपल्याला समाजात दिसून येतात.
सर्वांच्याच बाबतीत ते लागू पडेल, असं नाही.
पण आज बर्‍याच मोठ्या प्रमाणात ही परिस्थिती आपल्याला आजूबाजूला दिसून येते. हे एक कटू सत्य आहे.
निदान आपल्या हिंदू समाजात तरी यातील बर्‍याच बाबी घडत आहेत, असंच मी म्हणेन. (कारण इतर धर्माचे मला माहिती नाही आणि जाणून घेण्याची इच्छा ही नाही) मी आपल्याच हिंदू धर्माच्या बाबतीत
असे का म्हणतोय? याचे उत्तर खाली तुम्हाला मिळेलच.
जाता जाता मूकनायक @Muk_Nayak यांनी जे लिहिलं आहे ते थोडसं माझ्या शब्दात मांडतो. प्रयोगात जे काही निष्कर्ष निघालेले आहेत, तशीच आज आपल्या हिंदू धर्माची किंवा समाजाची अवस्था आहे. लोकं कौटुंबिक जबाबदार्‍या टाळत आहेत, मुलं कमी
जन्माला घालत आहेत, समाजापासून दूर राहून एकलकोंडी होत आहेत आणि पुरुषांचे 'वेगळेच नखरे' सुरू झालेले आहेत, (स्त्रियांचेही असूच शकतात) हे आपल्याला दिसून येत आहेच. त्यामुळे समाज विनाशाकडे चाललेला आहे का? हा विचार आपल्याला एकदा तरी नक्कीच करावा लागेल.
धन्यवाद!
पवन✍️
हा लेख @squineon यांनी इंग्रजीत पोस्ट केलेला आहे. तो मराठीत भाषांतर करण्यासाठी मूकनायकजी @Muk_Nayak यांनी पाठवला, सोबतच काही मला अडचणी आल्यावर त्याठिकाणी मुद्दा समजावून सांगण्यासाठी मदत सुद्धा केली, त्यासाठी मूकनायकजी आपले आभार.
याचाच असलेला एक छोटासा व्हिडीओ सुद्धा मी इथे जोडत आहे. आपण तो जरूर बघावा ही विनंती.
youtu.be

Loading suggestions...