धोतीराम झुले
धोतीराम झुले

@jhuleDhotiRam

17 Tweets 1 reads Nov 20, 2021
मोदीनी कृषी कायदे रद्द केले, बरं झाल!
पंजाब: असंख्य मीडिया रिपोर्ट्सनी एकेकाळी देशातील सर्वात वेगाने वाढणारे राज्य असलेल्या पंजाबमध्ये ड्रग्सने घातलेल्या धुमाकुळाबद्दल माहिती दिली आहे. मादक पदार्थाचा गैरवापर आणि ड्रग्जच्या व्यसनात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
दलालांमुळे राज्याची ढासळलेली कृषी अर्थव्यवस्था, वाढती बेरोजगारी आणि ग्रामीण भागात हालाखीच्या परिस्थितीत जीवन जगणारी पंजाबची तरुणाई ड्रग्जकडे वळली आहे हे सत्य आहे. ड्रग्सच्या आहारी गेलेली तरुण पिढी हातात हत्यार उचलायला वेळ लावत नसते, हे जगभरात अनेक ठिकाणी पाहण्यात आले आहे.
नेमकं, हेच पंजाब मध्ये होत आहे! अमरींदर सिंग काँग्रेसी होते, पण हे सगळं त्यांना माहीत होते. गेल्या 4 महिन्यात (राजीनामा देण्या आधी पासून) त्यांच्या वाढलेल्या दिल्ली फेऱ्या, डोवल यांच्याशी नियमित होत असलेला संपर्क आणि त्यांनी वेळोवेळी केंद्राला दिलेले 'dossier' हे पुढे येणाऱ्या-
महासंकटाकडे बोट दाखवत होते. सिस्टीमला लागलेली कीड, आणि पक्षाकडून होत असलेली अडवणूक या दोन्ही गोष्टी त्यांना काम करू देत नव्हत्या. केंद्राशी होत असलेला त्यांचा संपर्क काँग्रेस नेतृत्वाला पसंद नव्हता, आणि यातूनच त्यांची कालांतराने विकेटही गेली! अशात, काही लोकांकडून ड्रग्स आणि-
दहशतवादासोबत यावेळी एक वेगळ्याच 'कॉक-टेल' स्ट्रॅटेजीला पंजाबात राबवायच्या प्लॅनची सविस्तर माहिती अगदी त्यांच्या 'ब्लु-प्रिंट' सकट अमरींदर सिंग यांनी जेंव्हा मोदींना दिली, तेंव्हा त्यांच्या पायखालची जमीनच सरकली! नंतरच्या काळात मोदी आणि अमरींदर सिंग यांची तब्बल 4 वेळा,
अमित शहांसोबत 6 वेळा आणि डोवल यांच्यासोबत अनेक वेळा औपचारिक व अनौपचारिक भेट झाली! ड्रग्स आणि दहशतवाद सोबत यावेळी हिंदू-शिख दंगली घडवून 40% पंजाबी हिंदूंना टार्गेट करायचा तो मास्टर-प्लॅन होता!! या सर्व खेळाच्या मागे ड्रग्स हे कारण वरकरणी दिसत असले तरी हा ड्रग्स पासून सुरू होऊन-
पॉलिटिक्स पर्यंत आलेला 'नार्को-पॉलिटिक्स' चा खेळ होता, यात माफियाच नाही तर त्यांना राजकीय पाठबळ देणारी एक जमात पण सक्रिय होती. तोवर 'प्लॅनिंग'च्या स्टेजवर असलेल्या या मास्टर-प्लॅन मध्ये अमरींदर सिंग यांना या संपूर्ण equation मधून हटवणे हे या मास्टर-प्लॅन ला कार्यान्वित करायची-
पहिली पायरी होती. हे झालं, तेंव्हाच पंजाब ज्या टाईम-बॉम्ब वर बसला होता, त्याला निकामी करण्यासाठी मोदींकडे खूप कमी वेळ आहे हे त्यांना स्वतःलाही माहीत होतं.
तरीही, मोदींनी एक प्रयत्न केला. BSF चे कार्यक्षेत्र वाढवून पंजाबला वाचवता येईल असं त्यांना वाटलं.
मुख्यमंत्री बदलला, आणि नवीन मुख्यमंत्र्याने (त्यांना वरून आलेल्या आदेशानुसार) तेही होऊ दिलं नाही! इकडे हे लक्षात घ्या : पंजाबचे क्षेत्रफळ आहे 50362 चौरस कमी. पंजाबला लागून आंतरराष्ट्रीय बॉर्डर आहे 553 किमी. 50 किलोमीटर कार्यक्षेत्र बीएसएफ ला दिले असते तर 27650 चौरस किलोमीटर-
क्षेत्रफळ, अर्थात 55% पंजाब थेट अमित शहा यांच्या देखरेखीखाली आणता आला असता! जर ते शक्य झालं असतं, तरीही मोदींनी एकवेळ रिस्क घ्यायचा विचार 100% केला असता.
मोदी सरकारचा बीएसएफचे कार्यक्षेत्र वाढवायचा प्लॅन अपयशी ठरल्यावर दोन गोष्टी झाल्या. एक : मोदी सरकारकडे पर्याय शिल्लक-
राहिले नाहीत. दुसरा : पंजाब पेटवायचा प्लॅन असणाऱ्या लोकांना समजलं की त्यांचा डाव केंद्राच्या लक्षात आला आहे आणि त्यांना लवकरात लवकर काही तरी करावं लागणार आहे. म्हणूनच, कृषी आंदोलन चिघळवून त्याला 'ट्रिगर' म्हणून वापर करायची योजना आखण्यात आली! या आंदोलनाला खलिस्तानी, टुल-किटवाले,
आंतरराष्ट्रीय मीडिया, काही राजकीय पक्ष आणि आपल्याच घरातील लाल-हिरव्या सापांचा पाठिंबा तर आधीही होता. पंजाबला 1980 च्या दशकातील पंजाब बनवण्यासाठी हे तयार बसले होते. फक्त दहशतवादच नाही, तर त्यात 40% हिंदू टार्गेट होणार म्हटल्यावर तर त्यांना कुठल्याही परिस्थितीत ही संधी वाया-
जाऊ द्यायची नव्हती. त्यांनी ब्लॉग्स, पोस्ट्स, ट्विट्सच नाही तर न्यायालयात याचिकांपासून बातम्यांच्या हेडलाईन्स व अग्रलेख लिहून आधीच तयार करून ठेवले असणार! आज मोदींनी त्यांच्या मेहनतीवर आणि मनसुब्यांवर पाणी फेरलं आहे.
बाकी, आज मोदींना नीट ऐकलं असेल त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली-
असेलच. मोदी आज बोलले : "किसानों के लिए किया था, देश के लिए वापिस ले रहा हूँ !"
डजनभर साईड-इफेक्ट्स आत्तापासूनच दिसू लागले आहेत. त्यावर वेगळी पोस्ट लिहीन. पण, केवळ 5-6 तासात दिसत असलेले त्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाचे दोन :
★ जयंत चौधरी यांना भाजपकडून 14 नोव्हेम्बर रोजी एक-
निरोप आला होता. त्यादिवशी RLD-SP युतीची घोषणा होणार होती. त्यांना आलेल्या निरोपानंतर त्यांनी ती पुढे ढकलून 20 नोव्हेम्बर केली. उद्या, ही घोषणा होईल असं वाटत नाही. जयंत चौधरी आता भाजपसोबत युती करायला मोकळे आहेत. पश्चिम उत्तर प्रदेशच्या जाट-बहुल भागातील 20-25 जागांवर याचा थेट आणि-
मोठा परिणाम होईल.
★ पंजाबात आता कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. पंजाब निवडणुकीनंतर 'राष्ट्रपती शासन' हाच पर्याय उरणार आहे. त्यासाठी अमरींदर सिंग आणि भाजप 'जे आवश्यक असेल' ते करायला तयार आहेत. अमरींदर सिंग यांनी मोदींच्या निर्णयाचे स्वागत तर केलेच आहे,
भाजपसोबत निवडणुका लढण्याची घोषणाही केली आहे.
✍️ - वेद कुमार

Loading suggestions...