धोतीराम झुले
धोतीराम झुले

@jhuleDhotiRam

20 Tweets Nov 24, 2021
#धागा:-
अचानक असे काय घडले...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे १०० कोटी वसूली प्रकरण कोर्टात आहे. काल शरद पवार साहेबांनी पत्रकार परिषदेत अनिल देशमुख यांची पाठराखण केली. अनिल देशमुख यांच्या अटकेच्या प्रत्येक मिनिटाचा हिशेब-
न चुकता करावा लागेल असे जाहिरपणे सांगितले. १८ मार्च २०२१ दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर नंतर जवळपास ९ महिन्यांनी काल शरद पवार अनिल देशमुख या विषयावर बोलले.
▪️ED ने तब्बल ५ वेळा संमन्स पाठवूनही अनिल देशमुख हजर होत नव्हते तरीही शरद पवार साहेब काही बोलले नाहीत...
▪️ED ने त्यांच्या मुलाला आणि पत्नीवर कारवाई केली तरीही शरद पवार साहेब काही बोलले नाहीत...
▪️ED ने अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाखाची संपत्ती जप्त केली तरीही शरद पवार साहेब काही बोलले नाहीत…
▪️अनिल देशमुख फरारी आहेत असे ED जाहीर करणार अशी वेळ आली होती तरीही शरद पवार काहीच बोलले-
नाहीत...
▪️ED ने अनिल देशमुख हे अध्यक्ष असलेल्या साई शिक्षण संस्थेच्या अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांवर छापे टाकले तरीही शरद पवार काहीच बोलले नाहीत...
▪️अनिल देशमुख विदेशात पळून गेले अशी चर्चा सुरू झाली तरीही शरद पवार काहीच बोलले नाहीत...
पण अचानक कालापासून शरद पवार साहेब-
अनिल देशमुख प्रकरणात बोलायला लागले आहेत.
अनिल देशमुख यांचे नाव १०० कोटी वसूली प्रकरणात आले तेंव्हापासून अनिल देशमुख फरारी होते. अनिल देशमुखानी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन अटक टाळण्यासाठी आणि ED कारवाई टाळण्यासाठी प्रयत्न केले होते पण सुप्रीम कोर्टात सुद्धा त्यांना कोणताही-
दिलासा मिळाला नाही. अखेर दिवाळीच्या आधी १ नोव्हेंबर रोजी अनिल देशमुख स्वतःहून ED कार्यालयात हजर झाले. अपेक्षेप्रमाणे ED ने अनिल देशमुख यांना अटक केली आणि त्यांना बॉम्बे हायकोर्टात हजर केले.
सध्या पवार साहेब #परमबीर_सिंग_फरार_आहेत असे मुद्दाम सांगत आहेत आणि तक्रार करणाराच फरारी-
आहे असेही सांगितले जाते.
आदर्णीय शरद पवार साहेब हे विसरत आहेत की सचिन वाझे यांने ED आणि CBI चौकशीत कबूल केले आहे की त्यांनी ४ कोटी ७० लाख रुपये संजीव पालांडे यांच्या मार्फत अनिल देशमुख यांना पोहचवले आहेत. सचिन वाझे यांनी तसे एक पत्र सुद्धा हायकोर्टात दिले होते. मुकेश अंबानी-
#शरद_पवार_साहेब_विचारतात_की_परमबीर_सिंग_कुठे_आहेत?
अनिल देशमुख या प्रकरणाची सुरुवात मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं ठेवण्यावरून झाली आहे. सचिन वाझे यांनी मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं ठेवेली हे तपासात समोर आले आहे.
▪️स्फोटकं का ठेवली तर अंबानी यांच्यावर दबाव आणून-
खंडणी मिळवण्यासाठी...
▪️खंडणी कशासाठी तर १०० कोटींचे टार्गेट लवकर पूर्ण करण्यासाठी...
▪️आणि १०० कोटी रूपयांचे टार्गेट कोणी दिले तर अनिल देशमुख यांनी...
आणि त्यानंतर परमबीर सिंग यांची या प्रकरणात एन्ट्री झाली...
महिना १०० कोटींचा गवगवा गावभर झाल्यावर महाविकास आघाडी सरकारचे-
#महावसूली_आघाडी_सरकार असे झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने कारवाईचे सोंग घेतले. प्रकरण हायकोर्टात असल्यामुळे महाराष्ट्र सरकारला फारसे काही करता येत नव्हते. महाराष्ट्र सरकारने मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना विचारले की तुम्हाला यावर काय म्हणायचे आहे? त्यावर परमबीर सिंग यांनी-
असे सांगितले की अनिल देशमुख यांच्या १०० कोटी वसूली आदेशाची कल्पना त्यानी #मुख्यमंत्री_उद्धव_ठाकरे_आणि_शरद_पवार_यांना_दिली_होती. महिन्याला १०० कोटी वसूली प्रकरण अंगाशी येते म्हटल्यावर सर्व #राजकीय_नेत्यानी आपले हात झटकून टाकले आणि #एकट्या_परमबीर_सिंग_यांना_अडकवण्याचा_प्रयत्न_केला.
परमबीर सिंग यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवल्यानंतर आणि त्याच्या एकट्यावर कारवाई होणार असे दिसताच परमबीर सिंग सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना खालच्या कोर्टात जाण्यासाठी सांगितले आणि त्यापूर्वी तक्रार दाखल करण्यास सांगितले.
मग परमबीर सिंग, एंटीलिया स्फोटकं आणि १०० कोटी प्रकरण मुंबई हायकोर्टात आले व अनिल देशमुख प्रकरणाने वेग घेतला आणि त्यानंतर अनिल देशमुख यांचा राजीनामा परमबीर सिंग बेपत्ता हे सगळे आपण जाणतोच.
आपली अटक टाळण्याचे सगळे मार्ग संपल्यावर १ नोव्हेंबर रोजी अनिल देशमुख स्वतः ED कार्यालयात-
हजर झाले. त्यानंतर ED ने त्यांची चौकशी सुरू केली व त्यासाठी आवश्यक ती कस्टडी ED ने मागून घेतली. पहिली कोठडी ६ नोव्हेंबर रोजी संपली पण पुन्हा १२ नोव्हेंबर पर्यंत कोठडीत वाढ करण्यात आली होती. ED ने १२ नोव्हेंबर रोजी अनिल देशमुख यांना कोर्टात हजर केले होते आणि त्याचवेळी-
#खा_सुप्रियाताई_सुळे_यांनी_अनिल_देशमुखांची_भेट_घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये एवढे दिग्गज नेते असताना सुप्रिया सुळे ह्याच अनिल देशमुख यांना का भेटायला आल्या हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. सुप्रिया सुळे आणि अनिल देशमुख यांची कोर्टाच्या आवारात होणारे-
#बोलणे_बाहेर_कुठे_जाऊ_नये_यासाठी_ही_गुप्तता_पाळली_होती. आता या भेटीत काय बोलणे झाले हे कोणालाच माहित नाही. #सुप्रिया_सुळे_आणि_अनिल_देशमुख_यांच्या_भेटीनंतर_शरद_पवार_साहेब_अचानक आक्रमक झाले आणि त्यांनी नागपूर दौऱ्यात थेट हिशेबाचीच भाषा केली. शरद पवार साहेब यांना ५० वर्षांपेक्षा-
जास्त असा राजकीय अनुभव आहे आणि कोणत्याही #न्यायप्रविष्ट_विषयावर_जाहिर_बोलायचे_नसते असा दंडक आहे. पण शरद पवार साहेब यांनी न्याय प्रविष्ट विषयावर बोलायचे नसते एवढे तारतम्य पाळले नाही. अनिल देशमुख प्रकरणात ९ महिने काहीच शरद पवार साहेब अचानक आक्रमकपणे का बोलायला लागले असावेत हा-
कळीचा मुद्दा आहे. असेही घडले असू शकते की #अनिल_देशमुख_यांनी_सुप्रिया_सुळे_यांच्या_मार्फत_काही_निरोप_दिला असेल आणि #त्या_निरोपामुळे_शरद_पवार_साहेब_अस्वस्थ_झाले आहेत. काय असेल तो निरोप ज्यामुळे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अस्वस्थ झाली आहे.
अनिल देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे एवढे मोठे नेते नाहीत की #एकट्याने_१००_कोटी_वसूलीचा_निर्णय_घेऊ_शकतात. अनिल देशमुख यांच्यावर जो कोणी #मोठा_नेता आहे त्याचे नाव फक्त अनिल देशमुख हेच सांगू शकतात. आता अनिल देशमुख यांनी सुप्रिया सुळे यांच्या मार्फत-
#ते_नाव_सांगण्याची_किंवा_माफीचा_साक्षीदार होण्याची धमकी तर दिली नसेल...
सुप्रिया सुळे आणि अनिल देशमुख यांच्या या भेटीनंतर शरद पवार साहेब अचानक आक्रमकपणे का बोलायला लागले असे अचानक काय घडले...
✍️ -शितल कुंभार

Loading suggestions...