धोतीराम झुले
धोतीराम झुले

@jhuleDhotiRam

20 Tweets 6 reads Jan 03, 2022
पवार... पवार... पवार. भारताचे राष्ट्रीय नेते की महाराष्ट्राचे नेते की जाणता राजा शरद पवार ??????
● राष्ट्रीय नेते?
पश्चीम महाराष्ट्रातल्या 2-3 आणि मराठवाड्यातल्या 1-2 जिल्हा पुरता मर्यादीत नेतृत्व, ते ही स्थानिक बाहुबली नेत्यां च्या जीवा वर... जर स्थानिक नेत्यांनी पक्ष-
बदल केला तर तिथ... पवारांच्या नेतृत्वाला कोणी विचारत नाही, उदा. सोलापुर चे नेते मोहिते -पाटिल भाजप मधे गेले.. म्हाढा मतदार संघांने सोलापुर ने पवारांचे नेतृत्त्व नाकारले. 3-4 जिल्हा पुरती मर्यादित असलेल्या पवारांना राष्ट्रीय नेते म्हणणे एक मोठा विनोद, अतिशयोक्ती आहे ....
● #राजकीय #यशअपयश
दिल्ली च्या हायकमांडने शरद पवारांना 1-2 .. 1-2 वर्षा साठी अस चार वेळा मुख्यमंत्री बनवलं... यात शरद पवारांचे स्वत:च अस काही कर्तुत्व नव्हत, दगाबाजी शिवाय .
->18 जुलै1978 ते 16 फेब्रुवारी 1980= फक्त 20 महिने, पवारांना #पहिल्यांदा #मुख्यमंत्री केले ते मोरारजी-
देसाईनी
1977 ला इंदिरा कॉंग्रेस आणि भारतीय कॉंग्रेस असे वेगवेगळे निवडणुक लढले , इंदिरा कॉंग्रेसचे 62 आणि भारतीय कॉंग्रेसचे 69 चे आमदार निवडूण... अपक्ष आमदारांच्या मदतीने दोन्ही कॉंग्रेस 3 महिन्यातच परत एकत्र आले आणि यशवंतराव चव्हाणांनी वसंतदादा पाटीलांना मुख्यमंत्री-
शरद पवारांचा अपेक्षा भंग झाला .. पवारांच्या मनातला सत्तालोभ , तात्कालिन पंतप्रधान मोरारजी देसाईनी ओळखला आणि इंदिरा शह देण्या साठी- दोन्ही कॉंग्रेसला सत्ते पासून दूर ठेवण्या साठी .... राजकिय चाल करून, शरद पवारांना मुख्यमंत्री पदाची लालच दिली आणि मोरारजी देसाईनी-
जनता पार्टीच्या 99 आमदारांचा पाठिंबा दिला मग काय शरद पवारांनी दोन्ही कॉंग्रेस चे आमदार फोडले आणि स्थापन केले जनता पार्टी बरोबर "पुलोद सरकार " जे फक्त 20 महिने टिकले , 1980 ला इंदिरा गांधी पंतप्रधान होताच... इंदिरा गांधीने गैर कॉंग्रेस शासित अश्या 16 राज्यात राष्ट्रपती शासन-
लावत, सर्व राज्य सरकार पाडली , त्या एक होत शरद पवार मुख्यमंत्री असलेल पुलोद सरकार... म्हणजे पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले ते मोरारजी देसाईच्या कृपेने, जनता पार्टीच्या 99 आमदारांच्या कृपेने
हेच ते प्रकरण शरद पवरांनी मुख्यमंत्री वसंतदादा पाटीलांच्या " पाठीत खंजीर खुपसला "
आणि राजकीय गुरू यशवंतराव चव्हाणांना त्यांचाच पक्ष फोडत दगा दिला
-> 25 जून 1988 ते 3 मार्च 1990 = फक्त 20 महिने शरद पवारांना #दुसरयांदा #मुख्यमंत्री केल ते पंतप्रधान आणि हायकमांड पंतप्रधान कॉंग्रेस अध्यक्ष राजीव गांधीनी. कारण इंदिरा गांधीच्या हत्येच्या भावनिक लाटेवर-
राजीव गांधीनी महाराष्ट्रात प्रचंड बहुमत मिळवत सरकार स्थापन केले , A R अंतुलें ना मुख्यमंत्री केले,पण सिमेंट घोटाळ्या मुळे अंतुले मुख्यमंत्री पदा वरून पाय उतार झाले, मग राजीव गांधीनी शंकरराव चव्हाणांना मुख्यमंत्री केले .... पुढे शंकरराव चव्हाणांना दिल्लीत केंद्र सरकार मधे-
अर्थमंत्री बनवायचे होते म्हणून , राजीव गांधीनी शरद पवारांना मुख्यमंत्री केल.
-> 4 मार्च 1990 ते 24 जून 1991=फक्त 16 महिने #तिसरयांदा #मुख्यमंत्री केलं ते परत हायकमांड कॉंग्रेस अध्यक्ष पंतप्रधान राजीव गांधीनी ... फक्त 16 महिने का ? कारण मे 1991 ला लोकसभा निवडणुक प्रचारात-
राजीव गांधीची हत्या झाली.... मग आता देशाचा पंतप्रधान कोण होणार? आपल्याला पंतप्रधान पदाची आताच संधी आहे , हे लक्षात येताच ... शरद पवारांनी लोकसभा निवडणूक लढ़वली, मुख्यमंत्री पद सोडले आणि खासदार झाले..... पण सोनियां गांधीनी पंतप्रधान बनवले पी व्ही नरसिंहाराव यांना,तर शरद पवारांना-
संरक्षण मंत्री.
-> 6 मार्च 1993 ते 13 मार्च 1995= फक्त 24 महिने...
#चौथ्यांदा #मुख्यमंत्री दिल्लीत काय ठिक नाही म्हणत शरद पवारांनी सोनियां गांधीनी परत राज्यात परतण्याची इच्छा जाहीर केली, मग काय सोनिया गांधीना तेच हव होत.... हायकमांड सोनिया गांधीनी लगेचच शरद पवारांना चौथ्यांदा-
मुख्यमंत्री बनवल
आणि मग काय 1995 ला मुख्यमंत्री शरद पवारांच्या नेतृत्वा मधे लढवलेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या इतिहासात पहिल्यांदा पराभव झाला. शरद पवारांच्या नेतृत्वात पहिल्यांदा पराभव बघितला कॉंग्रेसने महाराष्ट्रात ... भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाले.
● शरद पवार आणि #पक्षांतर .... #पहिल्यांदा कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत, यशवंतराव चव्हाणाच्या कॉंग्रेस पक्षात प्रवेश ... #दुसरयांदा यशवंतराव चव्हाणांच्या कॉंग्रेस पक्ष फोडून दगा देत पुलोद मधे प्रवेश ...#तिसरयांदा पुलोद मधून बाहेर पडत स्वत:चा " शरद कॉंग्रेस " पक्ष स्थापन केला...
#चौथ्यांदा स्वत:चा " शरद कॉंग्रेस पक्ष " बंद करुन परत भारतीय कॉंग्रेस पक्षात प्रवेश... #पाचव्यांदा सोनियां गांधीनी भारतीय कॉंग्रेस पक्षातून काढून टाकल्या वर पी ए संगमा,सादिक अन्वर बरोबर मिळून तिघांनी NCP राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुरु केला...
● लालू प्रसाद यादव, मुलायम सिंग यादव, जयललिता , ममता बॅनर्जी, केजरीवाल , चौटाला, चंद्राबाबू नायडू , चंद्रशेखर रेड्डी , जगमोहन रेड्डी, मायावती...... असे अनेक नेते स्वबळा वर स्वत:च्या पक्षाला बहुमत मिळवत 2-4 वेळा मुख्यमंत्री झाले,स्वबळा वर राज्य सरकार स्थापन केली......
पण शरद पवार स्वबळा वर कधीच मुख्यमंत्री झाले नाही,कधीच स्वबळावर राज्य सरकार स्थापन केल नाही. कारण 4-5 जिल्हे सोडले तर बाकी उर्वरित राज्यात शरद पवारांना जनतेचा शून्य पाठिंबा आहे. पंतप्रधान सोडा मुख्यमंत्री पदाला विधानसभेत यांना कोणी मत देत नाही.
● #मराठा #नेता....
शरद पवारांच्या आई-वडील दोघांनी.. " सत्यशोधक समाज " स्वीकारलेला.. सत्यशोधक समाजाच्या चालीरीती स्वीकारल्या, मग शरद पवार मराठा कसे? हा कायम पडलेला प्रश्न.
शरद पवारांनी मराठा समाजा साठी एक ही सरकारी काम, सरकारी योजना केलेली नाही. मराठा आरक्षणात तर शरद पवारांच-
शून्य योगदान....मराठा समाजा साठी... मराठा आरक्षण, सारथी संस्था , स्व. अण्णासाहेब पाटील महामंडळ हे सर्व काही सुरु केल ते भाजप सरकारने. मराठा समाजा साठी एक ही सरकारी काम योजना न करणारे शरद पवार मराठा नेता कसे?
खरच 4-5 जिल्हातल्या काही मतदार संघा पुरत्या मर्यादित लोकल नेत्याला राष्ट्रीय नेता म्हणणे म्हणजे अतिशयोक्तीच.

Loading suggestions...