Pawan/पवन
Pawan/पवन

@thepawanupdates

13 Tweets 20 reads Jan 15, 2022
#Thread
काँग्रेस आणि भाजपच्या काळात देशाच्या सीमेवर कोणता बदल झालाय? हे जाणून घेण्यासाठी वाचा.🧵
@ByRakeshSimha सर सांगतात की, 2001 मध्ये ज्यावेळी 'ऑपरेशन पराक्रम' सुरू करण्यात आले होते त्यावेळी ते पाकिस्तान सीमेकडे जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करीत होते.
प्रवासात त्यांना 'मद्रास रेजिमेंट'चा एक जवान भेटला आणि त्याने त्यांच्याशी संवाद करायला सुरूवात केली. त्याने प्रश्न विचारला की तुम्ही हवाई दलात आहात का?
त्यावर राकेश सिंहजी हसले आणि म्हणाले की, तुम्ही मला पायलट समजलात म्हणून मला आनंद झाला पण मी एक साधा पत्रकार आहे.
जवानाने उत्तर दिले की, तुमचा 'Crew-Cut' बघून मला वाटलं की तुम्ही भारतीय हवाई दलात आहात.
आणि तिथून सुरू झालेलं संभाषण हे जवळपास एक तासभर चाललं.
त्या जवानाने सांगितले की, काँग्रेसच्या शासनकाळात ज्यावेळी ते एखाद्या पाकिस्तानी लष्कराच्या घुसखोराला पकडत होतो तेव्हा त्याच्यावर
कोणतीही कारवाई करण्याची आम्हाला मुभा नव्हती. इतकेच कशाला त्या पाकिस्तानी लष्कराच्या घुसखोराने आमच्या एखाद्या भारतीय सैनिकाचा जीव जरी घेतला असेल तरीही आम्हाला काहीही करण्याचा करण्याची परवानगी नव्हती.
त्याला पकडल्यानंतर सर्वात आधी आम्हाला आमच्या ब्रिगेड मुख्यालयाला कळवावे लागत
होते ज्याला 'जीएचक्यू' म्हणतात. तिथून मग संरक्षण मंत्रालय, नवी दिल्ली येथे फोन केल्या जात होता आणि तिथे संरक्षण मंत्रालयात बसलेल्या नागरी अधिकाऱ्यांकडून उत्तर यायचे की, "त्या पाकिस्तानी लष्करी घुसखोराला जाऊ द्या, उगाच कोणतंही संकट निर्माण करू नका".
त्याने मग दुसरी एक घटना
सुद्धा सांगितली. एकदा पाकिस्तानी सैन्याने चुकून एलओसी पार केलेल्या एका तरुण भारतीय जवानाला पकडले होते. त्यांनी त्याचा इतका क्रूर छळ केला की, आम्हाला अनेक तासपर्यंत त्याच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या.
पण आम्हाला असलेल्या सक्त आदेशामुळे त्याला सोडवायला जाण्याची परवानगी नव्हती.
अशा प्रकारची परिस्थिती काँग्रेसच्या शासन काळात भारतीय सैन्यदलाची होती.
आता भाजपाच्या शासनकाळात याउलट चित्र आहे. पाकिस्तानी लष्कराच्या घुसखोराला पकडल्यावर त्यावेळी जी खालून-वरपर्यंत फोनाफोनी केली जायची ती करण्याची आता गरजच नाही.
साधा-सोपा नियम आज आहे. तो म्हणजे,
ज्या युनिटने त्या पाकिस्तानी लष्कराच्या घुसखोराला पकडले असेल ते त्याच्यासोबत काय करायचे? याचा निर्णय "ऑन द स्पॉट" घेऊ शकतात.
भाजपाने दिलेल्या अशाप्रकारच्या "ग्रीन सिग्नल" मुळे भारतीय सैन्याद्वारे पकडल्या गेलेल्या पाकिस्तानी लष्कराच्या घुसखोराला खुलेआमपणे फाशी सुद्धा दिल्या गेली.
ते करण्यामागचा उद्देश सरळ आणि साधा होता की, त्याच्या युनिटचे जे उरलेले सहकारी आहेत, ते दुसऱ्या बाजूने बघत असतील.
आणि याचा खरोखरच फायदा झाल्याचे सुद्धा त्या जवानाने सांगितले.
याप्रकारच्या कृतीमुळे पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैनिकावर गोळीबार करण्याचा किंवा गोळीबार करून
त्यांना पकडण्याचा/अपहरण करण्याचा प्रयत्न सोडून दिलेला आहे.
पुढे तो जवान असेही म्हणाला की, मी माझ्या हाताने त्या शत्रूला स्वतः मारलेले आहे आणि ते करत असताना चुकीचे काम करतोय का? म्हणून परत एकदा विचार सुद्धा केला नाही कारण ते लोक "राक्षस" आहेत.
जाता जाता इतकेच म्हणेन की, या
दोन मिनिटाच्या छोट्याशा गोष्टीवरून लक्षात येते की, ज्यावेळी भाजपप्रणित सरकार असते त्यावेळी भारत सरकार किती खंबीरपणे आणि उघडपणे भारतीय सैन्याला सूट देत असते जी काँग्रेसच्या शासन काळात मिळत नाही.
ही तर २००१ ची गोष्ट आहे, आज तर मोदीजींच्या नेतृत्वात भारत सरकार काम करीत आहे आणि
मोदीजी सैन्याला किती मोकळीक देतात हे 'सर्जिकल स्ट्राईक' सारख्या मोहिमांवरुन आपण बघितलेले आहेच.
मग तरीही ज्याला असं वाटतं की, चीन किंवा पाकिस्तानचे सैनिक किंवा सैन्यदल हे भारताच्या सैन्यावर भारी
पडतंय त्याला "मूर्ख" (पप्पू/काँग्रेसी/वडापावसेनिक) म्हणू नाही तर काय म्हणू?
धन्यवाद!
पवन✍️
हा थ्रेड ज्यांनी पाठविला त्या @__aninda अनिंदापिडीयाजींचे आणि हा थ्रेड मराठीत करण्याची परवानगी @ByRakeshSimha सरांनी दिली त्यासाठी दोघांचेही मनःपूर्वक आभार.

Loading suggestions...