अमोल कडू-देशमुख
अमोल कडू-देशमुख

@KaduAmol

3 Tweets 2 reads Feb 15, 2022
रायरेश्वरावर घेतलेली शपथ म्हणजे महाराष्ट्र!
राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि राजे शहाजींचा निर्धार म्हणजे महाराष्ट्र!
जगतगुरु तुकोबारायांची वाणी आणि ज्ञानोबा माऊलींची लेखणी म्हणजे महाराष्ट्र!
नरवीर तानाजींची जिद्द, वीर बाजीप्रभुंची चिकाटी, नेतोजींचे शौर्य, हंबीररावांचा खंबीरपणा
म्हणजे महाराष्ट्र!
कवी भुषण आणि छंदोगामात्य कवी कलश यांची शुरवाणी म्हणजे महाराष्ट्र!
पेशवा बाजीरावांची निष्ठा, महादजी शिंदे आणि होळकरांचा बाणा म्हणजे महाराष्ट्र!
म्लेंच्छक्षयदीक्षित क्षत्रियकुलावतंस प्रभु छत्रपती शिवराय आणि हिंदुधर्मरक्षक छत्रपती शंभुराजेंचा इतिहास महाराष्ट्र!
महाराष्ट्र म्हणजे कोण्या सत्तेसाठी हापापलेल्या स्वार्थी पक्षाची जहागिरी नाही, गलिच्छ राजकारण करत स्वताला शिवभक्त म्हणविणारे आणि मनांत औरंग्याला पुजणारे स्वताला महाराष्ट्राचे पाईक म्हणु शकत नाहीत. खुर्चीसाठी नितिमत्ता आणि नैतिकता बासनात गुंडाळणारे स्वताला महाराष्ट्र कसे म्हणवतात?

Loading suggestions...