Pawan/पवन
Pawan/पवन

@thepawanupdates

15 Tweets 3 reads Feb 20, 2022
#Thread
सिमी आणि इंडियन मुजाहिदीनचे कर्दनकाळ मोदी-शहा!
शीर्षक वाचून जर अतिशयोक्ती वाटली असेल तर खालील पूर्ण घटनाक्रम वाचा.
शुक्रवारी 14 वर्षानंतर 26 जुलै 2008 रोजी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी अहमदाबादच्या विशेष न्यायालयाने सिमी आणि इंडियन मुजाहिदीनशी संबंधित 38 जणांना
1/15
फाशीची शिक्षा सुनावली.
हे वरवर जरी इतकं सोपं दिसत असलं तरी यामागे तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहराज्यमंत्री अमित शहा यांचा खूप मोठा हात आहे.
तो नसता तर कदाचित आज हे प्रकरण तडीस गेलं नसतं आणि देशातले सिमी आणि डियन मुजाहिदीनचे नेटवर्क उद्ध्वस्त झालं नसतं.
अहमदाबाद येथे ब्लास्ट झाल्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री या नात्याने नरेंद्र मोदी यांनी इंडियन मुजाहिद्दीन आणि सिमीचा कणा मोडण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली होती आणि आता या प्रकरणात 49 आरोपीवर दोष सिद्ध होवून त्यातल्या 38 जणांना फाशी झाली तर 11 जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा झाली.
त्यावेळी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 250 हून अधिक जण जखमी झाले होते.
बॉम्बस्फोटानंतर काय-काय घडलं? ते एकदा समजून घेऊया.
बॉम्बस्फोटाच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली
4/
आणि त्यावेळी अमित शहा गृहखात्याची जबाबदारी सांभाळली होती.
या प्रकरणाची सखोल आणि जलद चौकशी व्हावी. कारण, जर गुजरात पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला तर गुजरातचीच नव्हे तर देशाची मोठी सेवा होईल, असेही त्यावेळी बैठकीत नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते.
त्यासाठी त्यांनी दररोज
5/
राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. रोज होत असलेल्या तपासाचा आढावा घेतला आणि पुढील दिशा सुद्धा दिली.
ज्यामुळे फक्त 20 दिवसात या पूर्ण कटाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले होते.
16 ऑगस्ट 2008 रोजी गुजरात पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली आणि संपूर्ण कटाचे वेगवेगळे पदर
6/
जनतेसमोर मांडले.
त्यांनी सांगितले की, पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयच्या सांगण्यावरुन इंडियन मुजाहिद्दीनने हा हल्ला कसा घडवून आणला होता? या कटाचे धागे हे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ ते पाकिस्तानपर्यंत होते.
तपासादरम्यान दिल्लीच्या 'बाटला हाऊस'ची देखील लिंक
7/
लागली होती. त्यामुळे त्यांनी देशाच्या राजधानीतील पोलिसांशी सुद्धा त्यावेळी माहिती सामायिक करून त्या ठिकाणी छापा टाकला. ज्यामुळे कटाचा पर्दाफाश करण्यात, यश मिळाले.
तसेच गुजरातच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे हे खूप मोठे यश होते.
या प्रकरणातील पहिली लिंक
8/
ही राकेश अस्थाना यांच्याकडून उलगडण्यात आली होती. राकेश अस्थाना त्यावेळी वडोदराचे पोलीस आयुक्त होते आणि आज दिल्लीत त्याच पदावर आहेत. तपस करीत असताना सिमीच्या एका मॉड्युलने त्यांचे लक्ष वेधून घेतले आणि बॉम्बस्फोटात त्यांचे काही सदस्य सहभागी असल्याचे संकेत त्यांना मिळाले.
9/
त्याचवेळी अहमदाबादच्या क्राइम ब्रांच अधिकाऱ्यांना सुद्धा एक लीड मिळाली. त्यावेळी आशिष भाटिया हे त्या क्राईम ब्रँचचे नेतृत्व करत होते, जे आज गुजरातचे पोलीस महासंचालक (डीजीपी) आहेत.
तसेच सोबतीला अभय चुडास्मा, हिमांशू शुक्ला, तरुण बारोट आणि इतरही अनेक अधिकाऱ्यांनी या कटाचा
10/
पर्दाफाश करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
या प्रकरणात प्रथमच, मोबाइल टॉवर स्थानांचे विश्लेषण (लोकेशन ट्रेसिंग) प्रभावीपणे वापरले गेले. यासाठी नागरी सेवांमध्ये रुजू होण्यापूर्वी आयआयटी खरगपूरमधून इलेक्ट्रॉनिक्समध्ये बीटेक पदवी घेतलेल्या हिमांशू शुक्ला यांचे शिक्षण खूप
11/
उपयुक्त ठरले. शुक्ला यांनीच मुफ्ती बशर याला यूपीमध्ये पकडले होते.
गुजरातचे तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शहा आणि तत्कालीन डीजीपी पीसी पांडे हे अधिकाऱ्यांना सातत्याने आवश्यक मार्गदर्शन करत होते आणि त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडथळ्यांना दूर करत होते. बशरला लखनौहून विशेष
12/
विमानाने अहमदाबादला आणण्यात अनेक आव्हाने होती आणि खुद्द मोदींना यात हस्तक्षेप करावा लागला होता.
साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचा छडा लावणे हीच देशसेवा ठरेल, असे मुख्यमंत्री म्हणून मोदींचे शब्द खरे ठरले.
या कटाचा पर्दाफाश झाल्यानंतर देशात मालिका बॉम्बस्फोट थांबले.
13/
सिमीआणि इंडियन मुजाहिद्दीनचा कणा मोडला गेला.
गुजरात पोलिसांनी अत्यंत जबाबदारीने हे प्रकरण न्यायालयासमोर मांडले.
खटला इतका फुल-प्रुफ होता की 14 वर्षांच्या प्रदीर्घ खटल्यादरम्यान, एक किंवा दोन अपवाद वगळता, एकही आरोपी तुरुंगातून बाहेर पडू शकला नाही आणि अखेर आता
14/
गुन्हेगारांना शिक्षा झाल्यामुळे पीडित कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.
आता इतक सगळं पडद्यामागे मोदी-शहा यांनी घडवून आणल्यावर त्यांना सिमी आणि इंडियन मुजाहिदीनचे नेटवर्क तोडण्याचे श्रेय देणे अगत्याचे ठरतेच!
15/15

Loading suggestions...