ADITI Gujar
ADITI Gujar

@AditiGujar

8 Tweets 3 reads May 01, 2022
शेवटपर्यंत जरूर वाचा.
धर्मनिरपेक्षता
'रणजित देसाई' यांच्या 'श्रीमान योगी' या ऐतिहासिक कादंबरीत याचे खूप छान उदाहरण सापडते. ते इथे फक्त संदर्भ म्हणून देत आहे. कोणाचेही हितसंबंध डावलण्याचा हेतू नाही.
राजांची छावणी तिरुवन्नमलईला पडली होती...
सकाळची वेळ होती. राजे हंबीरराव, जनार्दनपंत यांच्यासह छावणीची पाहणी करत होते.
राजे म्हणाले, 'गाव किती सुरेख आहे !'
'एके काळी हे गाव हिंदूंचे तीर्थक्षेत्र होते.' जनार्दनपंतांनी सांगितले.
'एके काळी?'
'हो. येथे श्रीशिव आणि समेत्तिपेरुमल दैवतांची सुरेख मंदिरे होती.'
'मग त्याचं काय झालं?'
'विजयनगर साम्राज्याच्या विध्वंसाबरोबर ती मंदिरे मुसलमानी आक्रमणाखाली पाडली गेली.'
'अरेरे ! आता त्या ठिकाणी काहीही नाही?' राजांनी विचारले.
'त्या पुरातन मंदिरांच्या जागेवर
मुसलमानांनी मशिदी बांधल्या आहेत’.....
राजांची पावले थांबली. एका खड्ड्यात काळभोर नंदी उखळून विरुपावस्थेत पडला होता. त्याच्यापासून थोड्याच अंतरावर सुंदर पाषाणात कोरलेले भ्रष्ट शिवलिंग आजूबाजूच्या हिरवळीतून डोकावत होते. ते उजाड, विषण्ण अवशेष पाहून राजांचे मन उद्विग्न झाले. ते उद्गारले, 'माणसं जगतात तरी कशी?'
'सत्ताधार्‍यांच्या आक्रमणापुढे नेहमीच मान तुकवली जाते.'
'पंत, वतनाच्या हक्कासाठी पिढ्या-न्-पिढ्या झगडणारी माणसे. ही आमची वतने भंगली, तरी उघड्या डोळ्यांनी आम्ही ते पाहतो. आमची दैवते भग्न होतात, आणि ती आम्ही पाहतो.'
राजे समेत्तिपेरुमलच्या मंदिराचे मशिदीत झालेले रुपांतर पहात होते. राजे ते पाहून सुन्न झाले. 'धर्माच्या नावावर केवढे अधर्मी कृत्य हे !'
ज्या मंदिराच्या उभारणीसाठी शेकडो कलावंतांनी, शिल्पकारांनी अहोरात्र मेहनत घेतली असेल, ती माणसाच्या दृष्टीला सुखावणारी, थक्क करणारी,
परमेश्वराचा साक्षात्कार घडवणारी ही आमची मंदिरे परक्या धर्मप्रचारासाठी नेस्तनाबूत केली जातात. एवढंच नव्हे, तर त्याच पवित्र वास्तूवर मशिदी बांधल्या जातात. पंत, ही हिंमत आली कोठून?'
'महाराज !' रघुनाथपंतांचा आवाज विषण्ण झाला होता.
'त्याचं एकच कारण आहे !
मुसलमानांना त्यांच्या धर्माचा अभिमान आहे. त्या धर्मनिष्ठेपायी सर्वस्वाचे बलिदान करण्याची तयारी आहे. हे फिरंगी आपल्या धर्मासाठी सातसमुद्र ओलांडतात. परमुलखात धर्मप्रचार करतात.'
'केवढी त्यांची निष्ठा ! तीच निष्ठा त्यांना विजयी बनविते.’

Loading suggestions...