आज रहस्यकथा लेखक गुरुनाथ नाईक यांचा जन्मदिवस 🙏आपल्या रहस्यकथा आणि कादंबऱ्यांनी वाचकांच्या मनात खास स्थान निर्माण करणारे वाचकप्रिय लेखक.रहस्यकथा लेखकाला समीक्षकांच्या दरबारात मान नसला, तरी थेट वाचकांच्या पसंतीची पावती लाभणाऱ्या @LetsReadIndia @PABKTweets @pustakanibarach 👇
लेखकांमध्ये नाईक यांचे स्थान मोठे आहे.आकाशवाणी'साठी श्रुतिका आणि सांगीतिकांचे लेखन करीत असताना पुण्यातील एका प्रकाशकाने सुचविल्यानंतर त्यांनी रहस्यकथांच्या दालनात पाऊल टाकले आणि पुढे तब्बल एक हजारांहून अधिक (१२०८) कादंबऱ्या व रहस्यकथा लिहिल्या. त्यांच्या 'शिलेदार' कथांमधील 👇
कॅप्टन दीप, 'गरूड' कथांतील मेजर अविनाश भोसले, 'गोलंदाज' कथांमधील उदयसिंह चौहान, 'शब्दवेध' कथांमधील सूरज या पात्रांनी वाचकांच्या मनात असे घर केले, की एका कथेत मृत्यू झालेल्या पात्राला वाचकांच्या दबावापोटी त्यांना पुढील कथांमध्ये जिवंत करावे लागले. रंजकता आणि उत्कंठावर्धकता ही 👇
ही त्यांच्या लेखनाची खासियत; त्यामुळेच बहुसंख्य वाचक त्यांच्या कथांचा एका बैठकीत फडशा पाडत. गुरुनाथ नाईक यांनी विविध ठिकाणी पत्रकारिताही केली. स्वत:चे 'शिलेदार प्रकाशन' सुरू केले. वाचनभूक भागविली. ओतप्रोत थरार असलेल्या या कथा विशेषत: लहानपणी वाचनाची गोडी लावण्यास उपयुक्त ठरल्या.
Loading suggestions...