प्रविण कलंत्री
प्रविण कलंत्री

@KalantriPravin

6 Tweets 13 reads Dec 05, 2022
डाॅ. लक्ष्मण देशपांडे (५ डिसेंबर १९४३ - २२ फेब्रुवारी २००९ ) बहुरंगी मराठी लेखक, नाट्य दिग्दर्शक, व अभिनेते होते. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नाव आहे. हा बहुमान त्यांना त्यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या #पुस्तकआणिबरचकाही 👇
'वऱ्हाड निघालंय लंडनला' ह्या एकपात्री नाटकासाठी मिळाला. ह्या नाटकाचा पहिला प्रयोग त्यांनी इ.स. १९७९ मध्ये केला होता. तेव्हापासून या नाटकाचे १,९६० पेक्षा अधिक प्रयोग सादर करण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे. ह्या तीन तासांच्या एकपात्री प्रयोगात ते ५२ रूपे सादर करायचे. 👇
त्यामुळे लोक त्यांना वऱ्हाडकर म्हणायचे. . या नाटकाने अनेक विक्रम प्रस्थापित केले. हजारोंच्या संख्येने लोक प्रयोगांना हजर रहात. अमेरिका, इंग्लंड, सह अनेक देशांत वऱ्हाडचे प्रयोग झाले. प्रा. देशपांडे यांनी "वऱ्हाड निघालंय लंडनला' या नाटकाचे पुस्तक प्रकाशित केले. प्रतिकार हे 👇
त्यांनी लिहिलेल्या एकांकिकांचे पुस्तकही रसिकांना भावले. 'मौलाना आझाद-पुर्नमूल्यांकन' या पुस्तकाचे, तसेच महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या अक्षरनाद या पुस्तकाचे संपादन त्यांनी केले होते. त्यांना २००३ चा महाराष्ट्र शासनाचा कलावंत पुरस्कार, २००४ चा विष्णुदास भावे 👇
भावे पुरस्कार, याशिवाय छत्रपती शाहू महाराज, बेंडे स्मृती, अल्फा टीव्ही, पुरुषोत्तम करंडक, वसंतराव नाईक कृषी संशोधन प्रतिष्ठान, सयाजीराव महाराज यांच्या नावाचे पुरस्कार.
अखिल भारतीय नाट्यपरिषदेतर्फे साहित्यसम्राट आचार्य अत्रे पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. ( संकलीत)

Loading suggestions...