राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

11 Tweets Feb 28, 2023
1980 च्या दशकाच्या सुरुवातीस दलालांच्या (फक्त शेअर-बाजारातीलच नव्हे) टोळीने एका कंपनीच्या शेअरवर जबरदस्त हल्ला चढवला होता, ती कंपनी तेव्हाच्या एका वादग्रस्त व्यावसायिकाची होती. कंपनीचे प्रवर्तक हे स्वतः शेअर मार्केट ऑपरेटर नव्हते..(१)
त्यांना अडचणीत आणू पाहणाऱ्या लोकांना विश्वास होता की ते या व्यावसायिकाचा बाजार उठवू शकतात. हा हल्ला असा होता की या व्यावसायिकाला गाशा गुंडाळून घरी जावं लागलं असतं. पण, या खमक्या व्यावसायिकाने मात्र या दलालांच्या कारस्थानाचा लोड न घेता आपल्या परदेशातील मित्रांना संपर्क केला..(२)
त्यांनीही त्वरीत प्रतिसाद दिला आणि सुरू झाला 'काउंटर-अटॅक'! ज्यांनी या व्यावसायिकाला टार्गेट केलं होतं, त्यांना ओपन पोझिशन्स कव्हर कराव्या लागल्या! या सगळ्यात असा घाटा सहन करावा लागला की स्टॉक मार्केटच्या कोणत्याही 'खिलाडी'ने त्यानंतर त्या व्यावसायिकाचा पुन्हा नाद केला नाही..(३)
गम्मत अशी आहे की या व्यावसायिकाचे सर्वपक्षीय पोलिटिकल कनेक्शन्स उत्तम होते पण त्यांनी या राजकारणी लोकांची त्यावेळी मदत नव्हती घेतली.
अजून एक बाब म्हणजे त्यांच्या शेअर्सची किंमत 'ओव्हर-व्हॅल्यूड' होती अशी तेंव्हा चर्चा असत! पण, त्यात या व्यावसायिकाची काय चूक? (४)
त्याने पेट्रोकेमिकल्स, ऊर्जा, रिटेल, टेक्सटाईल, इन्फ्रास्ट्रक्चर, कॅपिटल मार्केटस, लॉजीस्टिक्स सगळीकडे एकापाठोपाठ एक आपला दबदबा निर्माण करायला सुरुवात केली होती किंवा तसे त्याचे प्लॅन्स होते. हा खेळ तोवर कोणी विचारही करू शकत नव्हतं, एवढ्या मोठ्या स्केल वर तो खेळू पाहत होता..(५)
शेयर्सच्या किमती केवळ कंपनीच्या आजच्या किंवा आधीच्या परफॉर्मन्स वर अवलंबून नसतात तर भविष्यातील प्लॅन्स व रणनीतीवरही अवलंबून असतात. अशात, त्याचे भविष्यातील प्लॅन्स व त्याची तयारी अशी असायची की शेयरचा भाव किती असावा याचे व्हॅल्यूएशन करणाऱ्या एक्सपर्ट्सनाच तो बुचकळ्यात टाकत असे..(६)
कारण लक्ष्यच जर रोज बदलत असेल तर परफेक्ट निष्कर्ष काढणं हे सोपं काम नसतं. एक्सपर्ट्स म्हणत की हा फुगा आहे, पण ज्यांनी त्याकाळात हे शेयर्स घेतले, त्यांची रिटायरमेन्ट त्या शेयर्सच्या भरवश्यावर आज मजेत चालली आहे.
या व्यावसायिकाचे नाव होते धीरूभाई अंबानी!..(७)
आजही एका व्यावसायिकाला दलालांनी (स्टॉक मार्केट मधीलच नव्हे) असेच लक्ष्य केले आहे. याही व्यावसायिकाचे सर्वपक्षीय पोलिटिकल कनेक्शन्स उत्तम आहेत. त्यांना अडचणीत आणल्यावर त्यांनीही परदेशातील मित्रांशी संपर्क साधला आहे ज्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे..(८)
काल त्यांच्या कंपनीत 3300 कोटी गुंतवणूक आली आहे. 6000 कोटी अँकर इन्व्हेस्टमेंट आली आहे. आज अजून 9000 कोटी रुपयांची 'फॅमिली ऑफिसेस' कडून परदेशातून गुंतवणूक येत आहे. त्यांचे 20000 कोटींचे लक्ष्य सक्सेस होणार अशी चिन्हे आहेत! त्यांचेही शेयर्स ओव्हर-व्हॅल्यू आहेत अशी चर्चा आहे..(९)
त्यांचेही बंदरे, विमानतळ, सिमेंट कंपनी, क्रिकेट फ्रँचायझी, हरित ऊर्जा, संरक्षण उपकरणे, सेमी-कंडक्टरपर्यंत मोठ्या आकाराच्या नवीन प्रकल्पांच्या जलद घोषणांच्या मालिकेने व्हॅल्यूएशन करणाऱ्या विद्वान लोकांसमोर एक अवघड असं moving target ते समोर ठेवत असतात..
हे आहेत गौतम अदानी!! (१०)
आज जर FPO यशस्वी झाला, तर 'इतिहासाची पुनरावृत्ती' तर होणारच, पण अनेक कारस्थानी टोळ्या ज्या या खेळात भारतीय उद्योगाच्या सक्सेस-स्टोरी ला बदनाम करण्यासाठी एकत्र आल्या आहेत.. ते त्या व्यावसायिकाचा पुन्हा नाद करणार नाहीत!
नेमकं काय होतंय ते संध्याकाळी समजेलच! Fingers Crossed.

Loading suggestions...