राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

7 Tweets Feb 28, 2023
वाह, क्या सिन है!
वंदे भारत एक्स्प्रेसच्या आणि नव्याने बनलेला बेंगळुरू-म्हैसूर एक्सप्रेस-वे! जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा भारतात 'करून दाखवले' हे दर्शवणारे दृश्य..! (१)
राज्याचा व तात्पर्याने देशाचा विकास हा केंद्र आणि राज्याच्या दोन्ही सरकारांच्या सहभागानेच होऊ शकतो. या शतकाच्या सुरुवातीला श्रध्येय भारतरत्न अटलजी यांनी भारतात दळणवळण वाढवण्याचे मिशन हाती घेतले होते..(२)
मात्र, त्यानंतर 10 वर्षे देशात असे सरकार होते, ज्याने देशाचा फक्त बहुमूल्य वेळच वाया घालवला नाही तर फुल्ल-टाईम खाबुगिरी करत देश लुटला. देशाचे 10 वर्षे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी मग 2014 नंतर मोदी सरकारला दुप्पट मेहनत घ्यावी लागली. आजही ते ती मेहनत घेत आहेत..(३)
भारत आज आधुनिक पायाभूत सुविधांवर तब्बल 100 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने आगेकूच करत आहे. होय, 100 लाख कोटी! भारताचे धोरणच ‘गतीशक्ती’चे आहे व 2014 च्या आधीच्या UPA सरकरपेक्षा दुप्पट वेगाने काम सुरू आहे. आता मोदी भूमिपूजन करतात, उद्घाटनही मोदीच करतात..(४)
बरं, हे करताना फक्त भ्रष्टाचारालाच आळा घातला असं नाही तर आपल्या जातीला, व्होट-बँक बनलेल्या धर्माच्या लोकांना प्राधान्य देणे, विकासविषयक धोरणे लागू करताना राज्या-राज्यांमध्ये भेदभाव करणे अशा पद्धतीच्या नीच जनताद्रोही राजकारणाला आता तिलांजली देण्यात आली आहे..(५)
देशातील लोकांना सक्षम होण्याची संधी न देणाऱ्या व त्यांच्या गरजांसाठी त्यांना सरकारवर अवलंबून राहण्यास भाग पाडणाऱ्या विकृत राजकारणालाही पूर्णविराम देण्यात आलाय. स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतकाळात, देशाच्या प्रगतीने घेतलेला वेग आता कोणाच्या बापाने थांबणार नाही, मंदावणार नाही..(६)
उलट आता भारत अधिक विश्वासाने व निश्चयाने प्रगती करत राहणार आहे! आधीच्या व आत्ताच्या सरकारांमधील फरक मतदारराजाने ओळखला आहे..
झपाटल्या सारखी विकासकामे करत राहिलं की मग मतदानाच्या दिवशी EVM ऑटोमॅटिकलीच हॅक होऊन जातं. 2019 मध्ये झालं होतं, 2024 मध्येही EVM हॅक होणार आहे. लावा पैज!!

Loading suggestions...