जय श्रीराम! पुरोगामी किडा चावला कि हिंदुत्व विरोधाची झिंग चढते आणि मग महाशिवरात्री, संकष्टीच्या दिवशी अंबिकाचं गोड मटण भक्षण करून सनातन धर्मीयांना डिवचले जाते. त्यांच्या पंक्तीला बसलेल्यांनाही तीच गोष्ट लागू पडते कारण ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला..(१)
हा पराकोटीचा हिंदूद्वेष कधी हिंदुस्थानद्वेषात बदलला यांना कळलाच नाही. मग संविधान, शाहु, फुले, आंबेडकर यांची जपमाळ ओढणारे देशाच्या घटनात्मक संस्थावरच प्रश्नचिन्ह निर्माण करू लागले. आपल्या मनासारखा निर्णय झाला तर तो घटनात्मक आणि विरोधात गेला कि दबाव, खोके, मोदी, ब्ला ब्ला..(२)
एकूणच आपल्या पूर्वसूरींच्या विचारधारेला अनं ज्याने आतापर्यंत पक्षासाठी आयुष्य जाळलं त्या कार्यकर्त्यांना तुच्छ मानून हम करे सो कायदा असा अहंकार दाखवला की पदरात वाटोळं हे ठरलेलंच! त्यात, जे जे पक्ष वा संघटना वा नेते पुरोगामी विचारांच्या आहारी गेले त्यांची धुळदाणच उडाली..(३)
रिपब्लिकन संपला, शेकाप संपला, जनता दल संपले. अनेक नेते संपले. तरीपण उद्धव ठाकरे 'शरद पवार ब्रँड ऑफ पुरोगामीत्व'ला बळी पडले याचे आश्चर्य वाटते? नाही. उद्धव यांनी स्वतःच्या पदरात जळता निखारा घेतला, त्याला त्यांच्या कौटुंबिक इतिहासाची कधीही विसरता येणार नाही अशी पार्श्वभूमी आहे..(४)
प्रबोधनकार ठाकरे सध्याच्या भाषेत सांगायचं झाल्यास "वोक" माणूस; प्रचंड वैचारिक गोंधळ आणि फाजील स्पष्टवक्तेपणा याचं कॉकटेल! अंतिम परिणाम कट्टर हिंदु विरोधी माणूस! जे जे हिंदू ते ते त्याज्य व जे जे फिरंगी ते ते ग्राह्य ही स्वयंघोषित "प्रबोधनकार" केशव ठाकरे यांची उघड भूमिका होती..(५)
कालांतराने, आणीबाणीत जेलमध्ये जायच्या भीतीने प्रबोधनकारपुत्र इंदिरा-भक्त झालेले! पण भाजपही त्यावेळी पराकोटीच्या वैचारिक गोंधळात (गांधीवादी समाजवादात बुडालेला) असल्याने कोणी स्वतःला हिंदुहृदसम्राट म्हणवून घेतलं तर त्यांना प्रॉब्लेम नव्हता. त्यातील धोके त्यांनी दुर्लक्ष केले..(६)
मुंबईच्या कम्युनीच गुंडांना ठेवण्यासाठी वसंतराव नाईक यांनी "मिलिशिया" म्हणजे खाजगी सेना उभारली ती म्हणजे शिवसेना उर्फ वसंतसेना! मराठीच्या मुद्द्यावर पोळी भाजून झाल्यावर पुढची राजकीय व व्यावहारिक सोय हे त्यांचं हिंदुत्व! इतकीच 'ठाकरे ब्रँड ऑफ पोलिटिक्स'ची विस्तृत व्याख्या..(७)
हे आता लोकांना व समर्थकांना समजू लागले असल्याने उद्धव ठाकरे यांची मोठी पंचाईत झालेली आहे. लहानपणापासून जी शिवसेना ऐकत, बघत आलोय ती जर आज असती तर काल रात्री चिन्हं आणि पक्ष यांचं नियंत्रण हातून गेल्या नंतर मुंबई पेटली असती! पण मुंबई शांत होती. सेना भवनवर तर स्मशान शांतता होती..(८)
आधीच्या पिढ्यांनी भावनिक आव्हानांच्या आहारी जाणारी अकर्मण्य, बावळट, स्त्रैण समर्थकांची फळी तयार करून फायदा उचलला. हे करताना सनातन हिंदू व मराठी धर्माशी द्रोह केला, पण त्या काळात सोशल मीडिया नसल्याने तो पचला. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. लोकांना मूर्ख बनवणे सोपे नाही..(९)
म्हणूनच अकर्मण्य ठाकरेंच्या हातून शिवसेना जमिनीवर सक्रिय लोकांच्या हातात गेली! हिंदुत्वाच्या विचारधारेचे भाजप व मोदीशा हेच उत्तराधिकारी आहेत व या महानदीने एक उपनदीसाठी सध्या ठाणे मार्गे वाट काढली आहे. होय उपनदीच!
ती मुख्य नदी नव्हे याची जाण राजकीय व सामाजिक धुरिणांनी ठेवावी..🙏
ती मुख्य नदी नव्हे याची जाण राजकीय व सामाजिक धुरिणांनी ठेवावी..🙏
Loading suggestions...