'इकोसिस्टिम' मधील एक तारा निखळला..😥(थ्रेड) :
मेलेल्या लोकांच्या टाळूवरील लोणी चाटून पुसून खाणारे, भारताचे माजी सरन्यायाधीश ए.एम.अहमदी यांचे परवा निधन झाले. वकील, न्यायाधीश असताना आणि रिटायरमेंट नंतर.. अगदी मरेस्तोवर हे एकनिष्ठ काँग्रेसी होते..(१)
मेलेल्या लोकांच्या टाळूवरील लोणी चाटून पुसून खाणारे, भारताचे माजी सरन्यायाधीश ए.एम.अहमदी यांचे परवा निधन झाले. वकील, न्यायाधीश असताना आणि रिटायरमेंट नंतर.. अगदी मरेस्तोवर हे एकनिष्ठ काँग्रेसी होते..(१)
तशी तर त्यांनी बऱ्याचदा माती खाल्ली, पण त्यातील सगळ्यात भिक्कारडे योगदान सांगतो :
जगातील सर्वात विनाशकारी औद्योगिक 'अपघातपात' भोपाळ गॅस लिक प्रकरणात, ज्यात 558125 लोकं विषारी मिथाइल आयसोसायनेट (MIC) लिक झाल्यामुळे गंभीर आजारी, किमान 25000 मृत्यू व 3900 कायमचे अपंग झाले..(२)
जगातील सर्वात विनाशकारी औद्योगिक 'अपघातपात' भोपाळ गॅस लिक प्रकरणात, ज्यात 558125 लोकं विषारी मिथाइल आयसोसायनेट (MIC) लिक झाल्यामुळे गंभीर आजारी, किमान 25000 मृत्यू व 3900 कायमचे अपंग झाले..(२)
अशा लाखो संसार उध्वस्त करणाऱ्या प्रकरणात या अहमदी यांनी आपल्या मालकांना वाचवण्याचे काम केले होते! राजकारणी, नोकरशाही आणि न्यायव्यवस्थेतील एक भाग राजीव गांधी यांच्या इशाऱ्यावर, स्वतःच्या स्वार्थासाठी पीडितांच्या विरोधात काम करत होता, ज्याचे नेतृत्व याच अहमदी यांनी केले होते..(३)
भारताचे दोन माजी सरन्यायाधीश (CJI) यात गुंतले होते. आर एस पाठक यांनी युनियन कार्बाइड विरुद्ध केसेस बंद करण्याच्या बदल्यात USD 470 दशलक्ष मध्ये सेटलमेंट स्वीकारण्यास पीडितांना भाग पाडले. त्यानंतर लगेचच अमेरिकन लॉबीने पाठक यांना हेग येथील आंतराष्ट्रीय कोर्टात न्यायाधीश बनवले..(४)
हा समझोता राजीव सरकारने स्वीकारला होता, ज्यांनी संसदेत कायदा बनवून भोपाळ पीडितांचे प्रतिनिधित्व करण्याचे सर्वाधिकार स्वतःला दिले होते! ICMR ने गॅस गळतीच्या 3 दिवसांत 25000 मृतांचा आकडा दिला होता, तरी 3000 मरण पावले व 102000 जखमी झाले म्हणत ही सेटलमेंट मान्य करण्यात आली होती..(५)
सरन्यायाधीश अहमदी यांच्यासमोर ही केस आल्यानंतर त्यांनीही सेटलमेंट योग्य असल्याचे म्हटले! त्याबदल्यात युनियन कार्बाइड विरुद्ध सिव्हिल व क्रिमिनल लाएबिलिटी माफ करणेही योग्य असल्याचे म्हटले. त्याची कारणे कालांतराने समोर आलीच. ती कारणे पुढे सांगतो, पण त्याआधी..(६)
त्याआधी लक्षात घ्या की भोपाळ गॅस अपघातपात झाला, तेंव्हा भारताचे सरन्यायाधीश चंद्रचूड होते, आत्ताचे चंद्रचूड यांचे बाबा. त्यांच्या रिटायरमेंट आधीच या भयंकर दुर्घटनेशी संबंधित प्रकरणांत अनेक झोल घडत होते, तेंव्हा त्यांना कोणतेही 'ज्यूडीशीयल ऍक्टिव्हिजम' दाखवायची इच्छा झाली नाही.(७)
असो. चंद्रचूड यांच्यानंतर अहमदी यांच्यापर्यंत वर नमूद केलेल्या पाठक यांच्यासाहित 10 सरन्यायाधीश येऊन गेले, पण 'इकोसिस्टिम' अशी मजबूत होती की त्यातील ज्यांनी बिचाऱ्यांनी भोपाळ पीडितांना न्याय द्यायचा थोडाफार प्रयत्न केला, त्यांच्यानंतर आलेल्यांनी त्यावर वरवंटा फिरवला..(८)
त्यातही, पाठक व अहमदी यांनी पीडितांचे केलेले नुकसान व स्वतःचा केलेला फायदा सर्वाधिक होता.
SC खंडपीठाने युनियन कार्बाइडला भोपाळमध्ये 500 खाटांचे हॉस्पिटल बांधण्याचे निर्देश दिले होते, ज्यात भोपाळ गॅस अपघातपातातील पीडितांच्या उपचारासाठी आधुनिक सुविधा द्यायच्या होत्या..(९)
SC खंडपीठाने युनियन कार्बाइडला भोपाळमध्ये 500 खाटांचे हॉस्पिटल बांधण्याचे निर्देश दिले होते, ज्यात भोपाळ गॅस अपघातपातातील पीडितांच्या उपचारासाठी आधुनिक सुविधा द्यायच्या होत्या..(९)
युनियन कार्बाइडने न्यायालयाकडे मागणी केली की कंपनीचे जप्त केलेले शेअर्स सोडावे, ज्यातून ते हॉस्पिटल बांधतील. न्यायालयाने नकार दिला. कंपनीला स्वतःच्या तिजोरीतून वित्तपुरवठा करण्यास सांगितले. आरोपींनी न्यायालयात यावं यासाठी शेअर्स गोठवले आहेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले..(१०)
या स्टेजवर ही केस अहमदी यांच्याकडे आली आणि..
सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाचे नेतृत्व करणाऱ्या अहमदी यांनी जप्त केलेले सगळे शेयर्स कंपनीला परत देऊन टाकले! युनियन कार्बाइड चे अडकलेले पैसे मोकळे का केले, त्याचेही कारण पुढे देत आहे..(११)
सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाचे नेतृत्व करणाऱ्या अहमदी यांनी जप्त केलेले सगळे शेयर्स कंपनीला परत देऊन टाकले! युनियन कार्बाइड चे अडकलेले पैसे मोकळे का केले, त्याचेही कारण पुढे देत आहे..(११)
त्याव्यतिरिक्त, अहमदी यांनी युनियन कार्बाइडच्या अधिकार्यांवरील कलमे बदलली, जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकेल. आधी लावलेल्या आयपीसी कलमांमध्ये जन्मठेप किंवा दहा वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद होती..(१२)
तिकडे युनियन कार्बाइड ने हॉस्पिटल बांधायला घेतलं ते भोपाळ हॉस्पिटल ट्रस्ट (BHT) ची स्थापना करून, ज्याचे अध्यक्ष लंडनचे वकील सर इयान पर्सिव्हल होते. हा इयान पर्सिव्हल अहमदी यांचा मित्र आणि काँग्रेसच्या टॉप नेतृत्वाच्या अगदी जवळचा माणूस..(१३)
सर इयान पर्सिव्हल एप्रिल 1998 मध्ये मेला तेंव्हाचे BHT चे आर्थिक हिशेब बाहेर आले. तेंव्हा हे लक्षात आलं की सर इयान पर्सिव्हल याने आपल्या प्रवासावर, स्वतःच्या लंडन कार्यालयाचे नूतनीकरण आणि इतर ऐय्याशीवर US $2.5 दशलक्ष खर्च केले होते. अहमदी यांना हे आधीच माहीत होतं..(१४)
त्याच वर्षी ऑगस्टमध्ये, BHT चे नाव बदलून भोपाळ मेमोरियल हॉस्पिटल ट्रस्ट (BMHT) करण्यात आले. तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झालेले न्यायमूर्ती ए एम अहमदी स्वतः BMHTचे अध्यक्ष बनले! मित्र सर इयान पर्सिव्हल याने सुरू केलेली लूट अहमदी यांनी तशीच पुढे चालू ठेवली..(१५)
2004 ते 2008 मध्ये याच BHMT च्या हॉस्पिटलमध्ये भोपाळ गॅस पीडितांचा मल्टी-नॅशनल कंपन्यांच्या वेगवेगळ्या रोगांवरील विविध औषधांमुळे होणाऱ्या रिऍक्शन्स वर रिसर्च करण्यासाठी 'गिनी पिग्स' सारखा वापर करण्यात आला! {संदर्भ SC : WP (C) No.33 of 2012 Swasthya Adhikar Manch, Indore}..(१६)
जिवंत असताना जी कामं केली, त्यात अभिमानाने सांगावं असं एकही उल्लेखनीय काम न करणारे काँग्रेसी अजीज मुशब्बर अहमदी यांच्या निधनानंतर फक्त RIP एवढंच लिहून कसं चालणार होतं? म्हणून, त्यांचे कारनामे लोकांपर्यंत नेणं हीच त्यांना खरी 'आदरांजली' राहील असं वाटलं.
म्हणून हा थ्रेड-प्रपंच..🙏
म्हणून हा थ्रेड-प्रपंच..🙏
Loading suggestions...