Nikhil Bhamare बागलाणकर 🚩
Nikhil Bhamare बागलाणकर 🚩

@The_NikhilB

9 Tweets 2 reads Apr 22, 2023
#थ्रेड
विषय: शाश्वत शेती साठी प्रयत्नशील नेता देवेंद्र फडणवीस.
मी शेतकरी कुटुंबातून येतो आणि शेती विषयक अडचणी अनुभवल्या आहेत.
महाराष्ट्रात अनेक स्वयंघोषित शेतकरी नेते आहेत त्यांना शेतकऱ्यांच्या समस्या माहिती आहेत पण निदानासाठी नाही तर त्यांचा बाजार मांडून मत घेण्यासाठी.
महाराष्ट्रातील जवळपास सर्वच नेत्यांचं म्हणणं होत की कर्जमाफी केल्याने शेतकरी आत्महत्या थांबतील परंतु तसे काही झाले नाही.
कारण हा पर्याय तात्पुरता होता आणि परत कर्जबाजारी होऊन शेतकरी गळाला फास लावून आयुष्य संपवायचा.
पण,
नेत्यांना ह्या समस्यांच निदान करणे आवश्यक वाटले नाही तर उलट निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफी करून शेतकऱ्यांची मत घ्यायची सरकार स्थापन झाल्यावर पाच वर्ष त्या शेतकऱ्यानं कडे वळून देखील पाहायचं नाही एकंदरीत अस १०/१२ वर्ष चालले.
परंतु,
महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस अशे एकमेव नेते जे बोलले की कर्जमाफी ने शेतकऱ्यांची समस्या सुटणार नाही तर अधिक वाढतील आणि जर खरचं शेतकऱ्यांना समृद्ध करायचं असेल तर "शाश्वत शेती" हा एकचं पर्याय आहे.
कर्जमाफी बद्दल असे बोलणे म्हणजे शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाणे कारण👇
नेत्यांनी लावलेली कर्जमाफीची सवय आणि अचानक कोणीतरी मूळ मुद्द्यावर ठेवलेला बोट हे सर्व नविन होत शेतकऱ्यांसाठी.
तरीही कर्जमाफी झाली जे वेळीच कर्ज भरायचे त्यांचा विचार देखील देवेंद्र जी ह्यांनी केला आणि त्यांच्या साठी देखील योजना राबवली.
शाश्वत शेती साठी काय केलं?👇
शेती साठी सगळ्यात महत्वाची गोष्ट पाणी आणि शेती साठी पाणी नसल्यामुळें शेतकरी आत्महत्याच हे मुख्य कारणं होत.
त्या नुसार
महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात १: जलयुक्त शिवार ही योजना राबवण्यात आली.
मोठ्या प्रमाणावर ह्याच्या फायदा शेतकऱ्यांना झाला. नगर जिल्ह्यात ते पाहू शकता.👇
२: मराठवाडा वॉटर ग्रीड योजना ज्यात राज्यातील ११ धरणाचं पाणी एकमेकाशी जोडणे.
३: मागेल त्याला शेततळे ह्याने लाखो शेतकऱ्यांना फायदा झाला.
४: सरकार पुढील २ वर्षांत राज्यातील ३०% शेतकऱ्यांना सौरऊर्जा पंप कडे वळवणार.
जनेकरून
विजेचे लाखोंचे बिल येणार नाही आणि अखंडित वीजपुरवठा होईल.
अश्या अनेक योजना आहेत पण वरील योजना मी फक्तं शाश्वत शेती च्या दृष्टीने उपयोगी आहेत त्या सांगितल्या आहेत.
नक्कीच हे एवढे सोपे पण नाही परंतू 👇
होणार निदान नक्कीच "शाश्वत" आहे. एका रात्रीत होणारा बदल नाहीये हा ह्या साठी अनेक वर्षापासून प्रयत्न चालू आहेत आणि भविष्यात शेतकऱ्यांना शाश्वत शेती च महत्व समजेल...
#Devendra4Farmers
निखिल भामरे 🖋️
#nikhilwrites

Loading suggestions...