Avinash R Ingle
Avinash R Ingle

@IngleavinashR

5 Tweets 14 reads Jun 28, 2023
नवीन इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणाऱ्या मित्रांनो, ऍडमिशन घेताना एक काळजी घ्या, डेटा सायन्स, ए आय , बिग डेटा, अशा अभ्यासक्रमासाठी जर तिथे चांगल्या दर्जाचे अध्यापक उपलब्ध नसतील, तर त्याचा सुद्धा बाजार उठेल.. भरपूर जाहिरातींमध्ये ही मनमोहक शब्द वापरली जातात, त्या ठिकाणी चांगली अध्यापक
नसतील तर बाकी सगळे उठाठेव ही पाण्यात जाईल, चमकोगिरी करणाऱ्या कॉलेज पासून दूर राहा, तुम्हाला जर संगणक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करायची असेल, तर cs50 हा बेसिक कोर्स पूर्ण करा. ओपन सोर्स कॉन्ट्रीब्युशन शिकून घ्या, कुठलाही तंत्रज्ञान मानवी जीवनातील कुठल्या समस्या सोडवते
ते मुळापासून समजून घ्या.. वेळ लागेल पण यश नक्की मिळेल, जाहिरात बाजीला बळी पडू नका.
एका वेळी 10 कोर्स करू नका, बेसिक पूर्ण झाल्यानंतर प्रोजेक्ट बनवा, ते GitHub वर प्रकाशित करा, जे तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये चांगले योगदान करत आहेत त्यांनाच फॉलो करा. जे काहीही योगदान देत नाहीत ,
त्यांना तुमच्या यादीतून काढून टाका, उगाच फीड खराब करून घेऊ नका.
ट्विटर वर मराठी तंत्रज्ञान कम्युनिटी चांगली आहे, त्याचाही फायदा घ्या मोकळ्या मनाने प्रश्न विचारा, अनुभव आणि डेटा वर आधारित सल्ल्यावर काम करा. या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
#Employment #Engineering

Loading suggestions...